न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०७ एप्रिल २०२५) :- दोन वर्षे शहरातून तडीपार केलेल्या तरुणाने कोणत्याही प्रकारे पुर्वपरवानगी न घेता शहरात घातक शस्त्रासह प्रवेश केला. त्याच्याजवळ ५०,०००/- रुपये किंमतीचे गावठी बनावटीचे एक पिस्तुल मॅगझिन आणि व १,०००/- रु किंमतीचे दोन जिवंत राऊंड आढळले.
घातक शस्त्र जवळ बाळगण्यास बंदी आदेश असताना त्याने आदेशाचा भंग केला. दरम्यान (दि. ०६) रोजी दुपारी ४.३० वा. सुमारास सेमीट टावरच्या पाठीमागील संरक्षण भिंतीलगत क्लस्टरकडे जाणा-या रोडच्या फुटपाथ जवळ असलेल्या झाडा जवळ, चिंचवड येथून पोलिसांनी तरुणाला जेरबंद केले.
दिनेश गोरख माने (वय ३० वर्षे रा. नेहरुनगर, पिंपरी) असे अटक आरोपीचे नाव आहे. संत तुकाराम नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोउपनि पाटील पुढील तपास करीत आहेत.












