न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०७ एप्रिल २०२५) :- ” याला खूप माज आहे. हा प्रविण दरेकर बरोबर असतो. याची आज विकेट टाकली पाहीजे” अशी वल्गना करून दोघांनी हातातील लोखंडी कोयता जीवे ठार मारण्याचे उद्देशाने तरुणाच्या डोक्यात मारुन त्याला गंभीर जखमी केले.
दरम्यान खाली पडला असताना सिमेंटचा गट्टू उजव्या हाताच्या मनगटावर मारुन तरुणाला गंभीर जखमी केले आहे. तसेच दोघांनी शिवीगाळ करुन हाताने व लाथा बुक्क्यांनी मारहाण केली, असं फिर्यादीत नमूद आहे. जुन्या भांडणाच्या रागातून हा प्रकार (दि.०५) रोजी सायंकाळी ७.३० वा. सुमारास रामनगर, रहाटणी येथे घडला आहे.
विश्वजीत रणजित वाघमारे (वय १९ वर्षे) याने दिलेल्या फिर्यादीवरून काळेवाडी पोलीस ठाण्यात आरोपी १) संदीप शिवाजी राजपांगे, २) राहुल सिताराम वाघमारे या दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे. पोउपनि मेटे तपास करीत आहेत.