न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ एप्रिल २०२५) :- पिंपरी-चिंचवड शहरात एकूण १४३ लहान व छोटे नाले असून, हे सर्व नाले तुंबले होते. बांधकामाचा राडारोडा, पेव्हिंग ब्लॉक, विटा, दगड, गोटे, कचरा यामुळे हे नाले दरवर्षी तुंबतात. या तुंबलेल्या नाल्यांमुळे पावसाळ्यात नाल्यांच्या परिसरात मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचून धोकादायक स्थिती निर्माण होते. मात्र, यंदा महापालिकेच्या आरोग्य विभागाने मार्च महिन्यापासून नालेसफाईचे काम हाती घेतले. तसेच आतापर्यंत ५० टक्के नाल्यांची सफाई पूर्ण केल्याचा दावा केला आहे. त्यासाठी महापालिकेची तिजोरी साफ होत आहे.
नालेसफाई करताना शेकडो टन कचरा, बांधकाम व्यावसायिकांकडून टाकला जाणारा राडारोडा या नाल्यांमधून बाहेर काढण्यात आला आहे. हा कचरा आरोग्य विभागाच्या वाहनांतून मोशी कचरा डेपोमध्ये टाकण्यात येत आहे. त्यामुळे नाल्यांमध्ये कचरा टाकण्यावर कारवाई कधी होणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
शहरात १४३ लहान व मोठे नाले आहेत. त्या सर्व नाल्यांची मार्चपासूनच सफाई सुरू आहे. रस्त्यांच्या खालील नाल्यांचीही सफाई सुरू आहे.
– सचिन पवार, सहायक आयुक्त, महापालिका…












