न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ मे २०२५) :- ‘मी या एरियाचा भाई आहे. चुपचाप पैसे दयायचे’ असे म्हणत दोघांना शिवीगाळ व दमदाटी केली. पैसे देण्यास विरोध केला असता आरोपीने लाथाबुक्याने त्यांना मारहाण केली. शर्ट फाडुन शर्टाच्या वरिल खिशातील रु २,०००/- रु हे जबरीने काढुन घेवुन चोरी केली.
हा प्रकार पिंपळे सौदागर येथील कोकणे चौक ते पवनानगर रस्त्यावर पहाटेच्या सुमारास घडला.
फिर्यादी फहरान अल्ली शेख (वय. २० वर्षे रा. पवनानगर, पिंपळे सौदागर) यांनी आरोपी सुरज नामदेव सुतार (वय. ३० वर्षे रा. नखाते वस्ती) याच्या विरोधात फिर्याद दिली आहे. सांगवी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.