न्यूज पीसीएमसी नेटवर्क
मुंबई (दि. २४ जून २०२५) :- आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या प्रभागरचनेचे सुधारित वेळापत्रक सोमवारी राज्य शासनाने जाहीर केले. त्यानुसार प्रभाग रचना अंतिम करण्यास एक महिन्याची मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे महानगरपालिका, नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुका नोव्हेंबरपर्यंत लांबणार आहेत.
सुधारित वेळापत्रकानुसार मुंबई महानगरपालिकेसह राज्यातील राज्यातील अ, ब, आणि क वर्गाच्या महानगरपालिकांची प्रभागरचना ३ ऑक्टोबर ते ६ ऑक्टोबर या कालावधीत राज्य निवडणूक आयोग प्रभाग रचना अंतिम करेल आणि संबंधित महापालिकेचे आयुक्त ती प्रसिद्ध करतील.
तर ड वर्ग महानगरपालिकांची प्रभागरचना ९ ऑक्टोबर ते १३ ऑक्टोबर या कालावधीत राज्य निवडणूक आयोग प्रभाग रचना अंतिम करेल आणि संबंधित महापालिकेचे आयुक्त ती प्रसिद्ध करतील. नगरपरिषदांची २६ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर या कालावधीत राज्य निवडणूक आयोग प्रभाग रचना अंतिम करेल आणि संबंधित नगरपरिषदेचे मुख्याधिकारी ती प्रसिद्ध करतील.
















