- तर, दोन उपायुक्त शहर नव्याने दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. 04 जुलै 2025) :- पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयामध्ये प्रशासकीय कारणास्तव तीन पोलिस उपायुक्तांच्या जबाबदाऱ्यांमध्ये बदल करण्यात आले आहेत. पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी सोमवारी याबाबतचे आदेश दिले.
विवेक पाटील यांची बदली पोलिस उपायुक्त (मुख्यालय) या पदावरून पोलिस उपायुक्त, वाहतूक शाखा या पदावर करण्यात आली आहे. बापू बांगर यांची वाहतूक शाखेवरून परिमंडळ तीनचे पोलिस उपायुक्त म्हणून बदली झाली आहे.
दरम्यान, डॉ. शिवाजी पवार यांना परिमंडळ ३ वरून गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त म्हणून बदली करण्यात आली आहे. विशेष शाखेचा अतिरिक्त कार्यभारदेखील डॉ. पवार यांच्याकडे देण्यात आला आहे.
गेल्या आठवड्यात राज्यातील पोलिस उपायुक्तांच्या बदल्या झाल्या. यात पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेचे उपायुक्त संदीप डोईफोडे यांची मीरा भाईंदर-वसई-विरार पोलिस आयुक्तालयात बदली करण्यात आली.
परिमंडळ-१ च्या पोलिस उपायुक्त स्वप्ना गोरे यांची पुणे येथील राज्य राखीव पोलिस बल, गट क्रमांक २ येथे समादेशक म्हणून बदली झाली. पोलिस उपायुक्त संदीप डोईफोडे आणि स्वप्ना गोरे यांची बदली झाल्यानंतर पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयात नव्याने दोन उपायुक्त बदली होऊन आले आहेत.
नागपूर शहर आयुक्तालयातील विशेष शाखेच्या पोलिस उपायुक्त श्वेता खेडकर आणि छत्रपती संभाजीनगर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक संदीप आटोळे यांची उपायुक्त म्हणून पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयात नव्याने बदली करण्यात आली आहे.