न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. 04 जुलै 2025) :- श्री जगन्नाथ रथयात्रेचे आयोजन आंतराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ रावेत यांच्यावतीने आकुर्डी विठ्ठल मंदिर ते रावेत कृष्ण मंदिर ह्या मार्गावर करण्यात आले होते.
शहरातील मोठ्या संख्येने कृष्णभक्त ह्या यात्रेत सहभागी झाले होते. या प्रसंगी इस्कॉन रावेत प्रमुख प्रभु गौरांग दास, जयप्रकाश दास, माजी नगरसेवक प्रमोद कुटे, आप्पा बागल, कैलास कुटे, प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीचे अध्यक्ष डॉ. विजयकुमार पाटील, विभागीय अध्यक्ष विशाल शेवाळे, सतीश देशमुख, संतोष चव्हाण, राम सुर्वे, राजेंद्र कुंवर, संदीप कांबळे त्याचप्रमाणे संघ कार्यकर्ते उपस्थित होते.
गेल्या २३ वर्षांपासून रथ यात्रेचे आयोजन होत आहे. रथ मार्गाच्या प्रमुख चौकामंध्ये म्हणजेच आकुर्डी चौक, म्हाळसाकांत शाळा चौक, संभाजी चौक, बिजलीनगर चौक, गुरुद्वारा चौक, धर्मराज चौक, रावेत ब्रिज चौक येथे पोलीस प्रशासनासोबत प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीचे ८० एसपीओ,पोलिस मित्र व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ६० स्वयंसेवक यांनी वाहतूक नियंत्रण केले. कोठेही वाहतुक कोंडी झाली नाही त्याचप्रमाणे रथयात्रेसही कोणत्याच प्रकारचा अडथळा निर्माण झाला नाही. त्यामुळे श्री जगन्नाथ रथयात्रा सुरक्षित पार पडली.
प्रमुख चौकात विशेष परिश्रम उज्वला जगदाळे, जयश्री मानकर, अनुराधा वाघचौरे, वर्षा भोसले, विद्या परमार, ललिता झांबरे, वर्षा भारंबे, जागृती वायकुळे, विजया जंगले, वैशाली पवळे, प्रतिभा कांबळे, विभावरी इंगळे, कविता भिरुड, माधवी पाटील, वैष्णवी कानू, रुद्राक्षी कानू, सविता माने, पुष्पा साळवे, लता गायकवाड, भाग्यश्री वंजारे,उर्मिला देशमुख,चित्रा कोठावदे त्याचप्रमाणे नाना कुंबरे, तेजस सकट, अभिजीत जोशी, रवींद्र जांभळे, संजय गोरखा, संजू सपकाळ, सोपान थोरवे,जयप्रकाश शिंदे, मंगेश सकपाळ, संदीप सकपाळ, जयेंद्र मकवाना,तेजस सापरिया, रामेश्वर गोहिल, सुकेश येरूनकर,संदीप जाधव, प्रशांत जमदाडे, सातप्पा पाटील, दिलीप पाटील, राजेंद्र कुंवर, नितीन ढमणगे, नितीन मांडवे, राकेश गायमुक्ते, राजीव सपकाळ, सचिन माने, अमोल कानू, देवजी सापरिया, सुभाष माने,लहू पाटील, संजय पुंड, अंकुश पाटील, संजय लोखंडे, संजय कांबळे, निखिल कुमावत, विठ्ठल पाटील,सागर पाटील, शशिकांत जमदाडे, उमेश देशमुख,रुपेश चोरघे, खंडू थोरात, संतोष कंधारे,शुभम विश्वेश्वर, सुरज लोयरे, दिनेश जाधव, अमोल पुलावळे, श्यामराज पालके, श्याम चोरगे,अर्जुन साठे, संतोष कंधारे,तुकाराम दहे,नामदेव गाडे,रामशरण चौहान,मंगेश घाग,राहुल लुगडे यांनी घेतले.
रथ यात्रा तीन पोलीस ठाणे हद्दीत असल्याने निगडी पोलीस ठाणे, वाहतूक विभाग, चिंचवड पोलीस ठाणे व रावेत पोलीस ठाणे मधील पोलीस अधिकारी – कर्मचारी यांनी मोठ्या प्रमाणात बंदोबस्त ठेवला होता.