- चिंचवडचे अरुण जमखंडी यांचा यंदाही अक्कलकोट पायी वारीचा संकल्प…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
चिंचवड (दि. 09 जुलै 2025) :- चिंचवड येथील एक निस्सिम स्वामीभक्त अरुण जमखंडी यांनी तब्बल सहा वेळा चिंचवड ते अक्कलकोट पायी वारी एकट्याने केली आहे.
सर्व कपडे, अंथरूण-पांघरून सोबत पाठीवर घेऊन गावोगावी लोकांच्या गाठी भेटी घेतं त्यांनी हा प्रवास केला आहे. या वारीत त्यांना खूप वेगवेगळे अनुभव आले आहेत. ऊन, वारा, पाऊस यांची कोणतीही तमा न करता स्वामींचा आशिर्वाद पाठीशी आहे, या विश्वासावर ते सहज ही वारी पार पाडतात.
त्यांच्या म्हणण्यानुसार, ही वारी स्वामीचं करून घेतात, ते कुठेही काही कमी पडू देत नाहीत. कोणती अडचणही येऊ देत नाहीत. यंदाच्या गुरुपौर्णिमालाही अक्कलकोट येथे पायी जाऊन स्वामींना एक प्रकारची गुरुदक्षिणा द्यायचा त्यांचा मानस आहे
















