- तर, पोलीसांशी संपर्क करा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. ०९ जुलै २०२५) :- पिंपरी चिंचवड पोलीस स्टेशनच्या रेकॉर्डवरील एकूण १५ सराईत गुन्हेगारांवर पोलीस उप आयुक्त, परिमंडळ एककडून हद्दपारीची कारवाई करण्यात आली.
सराईत गुन्हेगारांवर ठोस व परिणामकारक कारवाई करण्याबाबत पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, पोलीस सहआयुक्त शशिकांत महावरकर व अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड यांनी सर्व पोलीस स्टेशनला आदेश दिलेले होते.
जानेवारी २०२५ ते जून २०२५ पर्यंत एकूण ९५ हद्दपार आदेश पारीत करुन त्यामध्ये एकूण १११ आरोपींना हद्दपार करण्यात आले आहे. तसेच पिंपरी चिंचवड कार्यक्षेत्रातील १०० हुन अधिक गुन्हेगारांच्या हालचालींवर पोलीसांचे बारकाईने लक्ष आहे. सराईत गुन्हेगारांना गुन्हे करण्यापासुन परावृत्त करण्यासाठी व गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी ठोस व परिणामकारक प्रतिबंधक कारवाई पोलीस करीत आहेत.
तडीपारांची नावे आणि कालावधी…
चिंचवड पोलीस ठाण्यातून अनुक्रमे दोन महिने, दोन आणि एका वर्षासाठी सद्दाम मोहम्मद तांबोळी (वय २० वर्षे, रा. पत्राशेड झोपडपट्टी, लिंकरोड, चिंचवड), सोहेल मोहम्मद तांबोळी (वय २६ वर्षे, रा. पत्राशेड झोपडपट्टी, लिकंरोड, चिंचवड), लखन उर्फ कार्तिक कैलास साठे (वय २१ वर्षे, रा. लिंकरोड, पत्राशेड, चिंचवड), स्वप्निल उर्फ आब्या संतोष भोसले (वय 25 वर्ष, रा. आनंदनगर झोपडपट्टी, चिंचवड), आदित्य बाबु आवळे (वय २० वर्षे, रा. आनंदनगर झोपडपट्टी, चिंचवड), श्रीनाथ अंकुश वाघमारे, वय २६ वर्षे, रा. भोंडवेनगर, वाल्हेकरवाडी, चिंचवड), सांगवी पोलीस ठाण्यातून दोन वर्षांसाठी रोहित डॅनिअल तोरणे (वय २३ वर्षे, रा. पिंपळेगुरव), अभय विकास सुरवसे (वय २७ वर्षे रा. सुदर्शन नगर, पिंपळे गुरव), अक्षय दशरथ शिंदे (वय २३ वर्षे, रा. वैदुवस्ती, पिंपळेगुरव), दापोडी पोलिस ठाण्यातून दोन वर्षांसाठी मंगेश अशोक यादव (वय ३२ वर्षे, रा. कासारवाडी), समिर जयवंत खैरनार, (वय २६ वर्षे रा. दापोडी), निगडी पोलिस ठाण्यातून अनुक्रमे दोन वर्ष आणि एकजण चार महिने करिता सचिन ऊर्फ सुनिल संतोष गायकवाड (वय २२ वर्षे, रा. त्रिवेणीनगर चौक, निगडी), आरमान ऊर्फ डायमंड मुन्ना खान (वय २३ वर्षे, रा. ओटास्किम निगडी), रुतिक अनिल जाधव (वय २५ वर्षे, रा. दत्तवाडी, पुणे), प्रसाद उर्फ लंब्या लक्ष्मण सुतार (वय २६ वर्षे, रा. पंचतारानगर, आकुर्डी) यांना तडीपार करण्यात आले आहे.
तर, पोलीसांशी संपर्क करा…
वरीलप्रमाणे हद्दपार करण्यात आलेले सराईत गुन्हेगार हे त्यांच्या हद्दपार कालावधीमध्ये पुणे जिल्ह्यात दिसुन आल्यास तात्काळ नियंत्रणकक्ष संपर्क क्र. ११२ तसेच जवळील संबंधित पोलीस ठाणेशी संपर्क साधावा असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
















