न्यूज पीसीएमसी नेटवर्क
चिंचवड (दि. ०९ जुलै २०२५) :- नॉव्हेल इंटरनॅशनल स्कूलमध्ये नुकत्याच आयोजित पालखी सोहळ्यात विद्यार्थ्यांनी भक्तिभावाने सहभाग घेतला.
स्कूलच्या विद्यार्थ्यांनी संत परंपरेचे दर्शन घडवत श्री विठ्ठल रुक्मिणी पालखीचे आयोजन केले होते. मुख्याध्यापिका मृदुला गायकवाड यांच्या हस्ते श्री विठ्ठल रुक्मिणी प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.
पालखी सोहळ्यास नॉव्हेल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आमदार अमित गोरखे, कार्यकारी संचालक विलास जेऊरकर, शाळेच्या व्यवस्थापक डॉ. प्रिया गोरखे, तांत्रिक विभाग प्रमुख समीर जेऊरकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
















