- मित्रासह जेवणाचे पार्सल घेण्यास निघालेल्या तरूणाला टेम्पोची धडक…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पुणे (दि. २१ जुलै २०२५) :- चाकण-शिक्रापूर रस्त्यावर पुन्हा एकाला अपघातात जीव गमावावा लागला आहे. मित्रासह पायी जेवणाचा डबा आणण्यास जाणाऱ्या तरूणाला आयशर टेम्पो चालकाने धडक देत त्याचा जीव घेतला आहे.
हा प्रकार कडाचीवाडी येथे शनिवारी सकाळच्या सुमारास घडला.
सुभाष आत्मराम हुपाडे (वय ५० वर्षे मूळ रा. राहाटी ता. दिग्रज जि. यवतमाळ) असे मयत व्यक्तीचे नाव आहे.
याप्रकरणी अविनाश मेश्राम यांनी पांढ-या रंगाच्या आयशर टेम्पो वरील अज्ञात चालकाविरोधात फिर्याद दिली आहे. त्यावरून चाकण पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांचा मिञ सुभाष हे रासे फाटा येथे दवाखान्यात त्यांच्यावर औषधोपचार करून जेवण पार्सल घेण्यासाठी कडाचीवाडी येथे पायी जात होते. त्यावेळेस समोरून चाकण बाजूकडून शिक्रापूर बाजूकडे जाणारा एक पांढ-या रंगाचा आयशर टेम्पो त्यावरील अज्ञात चालकाने त्याच्या ताब्यातील आयशर टेम्पो भरधाव वेगात व हयगईने चालवून रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून सुभाष यांस धडक देवून अपघात करून त्याच्या मृत्यूस कारणीभूत झाला व अपघाताची खबर न देता पळून गेला आहे.












