न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. २१ जुलै २०२५) :- पिंपरी ते शिरगाव दरम्यान रिक्षाचे भाडे घेवुन जाणाऱ्या रिक्षा चालकावर रिक्षा तात्काळ बाजूला न घेतल्याच्या कारणावरून धारदार चाकुने गळ्यावर गंभीर वार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
हा प्रकार (दि. २०) सकाळच्या सुमारास जुन्या मुंबई-पुणे रस्स्त्यावरील केंद्रीय विद्यालया समोर देहूरोड येथे घडला.
आरोपी भाडेकरु इसमाने त्यास लघवी लागल्याचे कारण सांगून रिक्षा तात्काळ बाजूला घेण्यास सांगितले असता, रिक्षा स्पीडमध्ये असल्याने काही अंतरावर थांबवली असता “तु रिक्षा मी सांगितल्यावर तात्काळ का बाजूला घेतली नाही थांब तूझ्याकडे बघतो”, असे म्हणुन आरोपीने वरील कृत्य केले आहे.
रिक्षा चालक सुभाष चव्हाण (श्रीनगर, रहाटणी) यांनी अनोळखी पुरुष इसमाच्या विरोधात फिर्याद दिली आहे. त्यानुसार देहुरोड पोलीसांनी अज्ञाताच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.












