न्यूज पीसीएमसी नेटवर्क
चिंचवड (दि. २२ जुलै २०२५) :- कॉलिटी सर्कल फोरम ऑफ इंडियाच्या पुणे चप्टरच्या वतीने टोटल कॉलिटी मॅनेजमेंट ( टी क्यू एम ) हा एक व्यवस्थापन दृष्टिकोन आहे जो ग्राहकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी किंवा त्यापेक्षा जास्त करण्यासाठी उत्पादने, सेवा आणि प्रक्रियांच्या गुणवत्तेत सतत सुधारणा करण्यावर केंद्रित आहे. प्रक्रिया, उत्पादने, सेवा आणि संघटनात्मक संस्कृती वाढविण्यासाठी उद्योग संस्थेमधील सर्व सदस्यांचा सहभाग यात असतो.
या दिशेने विविध उद्योग संस्थांनी अधिक पुढाकार घेण्यास प्रोत्साहित करण्यासाठी, क्वालिटी सर्कल फोरम ऑफ इंडिया ( क्यू सी एफ आय ) च्या पुणे चप्टरच्या वतीने टी क्यू एम कन्व्हेन्शन २०२५ चे आयोजन हायब्रिड मोडमध्ये आयोजित करण्यात आले होते . त्याचे भौतिक सादरीकरण स्पर्धा भोसरी येथील क्वालिटी सर्कल एक्सलन्स सेंटर येथे संपन्न झाली. तर व्हर्च्युअल सादरीकरण २८ जुलै रोजी होणार आहे.
संपन्न झालेल्या स्पर्धा मध्ये ३८ उद्योग संस्थांमधील एकूण २८५ जणांनी भौतिक स्पर्धेत भाग घेतला. केस स्टडी, स्लोगन आणि पोस्टर अशा श्रेणींमध्ये ११६ नामांकने प्राप्त झाली. सहभागी संस्थांच्या सदस्यांनी या श्रेणींमध्ये त्यांच्या नोंदी सादर केल्या.
या कार्यक्रमाचे उद्घाटन कमिन्स इंडिया लिमिटेडचे राजेंद्र कुलकर्णी यांनी दीप प्रज्वलन करून केले आणि. समारोप सत्राचे प्रमुख पाहुणे टाटा मोटर्स लिमिटेडचे नितीन कलमकर उपस्थित हे त्याचा स्मृतीचिन्ह देवून सत्कार पुणे चप्टरचे कौन्सील सदस्य माधव बोरवणकर यांनी केला . यावेळी
पुणे चॅप्टर कौन्सिल सदस्य डॉ. अजय फुलंबरकर, अनंत क्षीरसागर, धनंजय वाघोलीकर आणि परवीन तरफदार यावेळी उपस्थित होते.
केस स्टडी प्रेझेंटेशनचे स्पर्धाचे परीक्षण रितू मेहता, भबानी नाईक, शिरीष शनाणे, डॉ. संजय लकडे, चंद्रशेखर बापट, महादेव लोहार, मनीष फाळे आणि राहुल काशीकर यांनी केले. घोषवाक्य आणि पोस्टर स्पर्धाचे परीक्षण धनंजय वाघोलीकर आणि परवीन तरफदार यांनी केले.
सहभागी उद्योग संस्थामधील यशस्वी संघांना त्यांच्या गुणवत्तेनुसार सुवर्ण, रौप्य आणि कांस्य पदके मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आली.
क्यू सी एफ आय च्या पुणे चॅप्टरचे रहीम मिर्झा बेग , प्रशांत बोराटे, चंद्रशेखर रूमाले यांनी स्पर्धेचे उत्कृष्ट संयोजन केले.
फोटो ओळ : टाटा मोटर्स लि . चे नितीन कळमकर याचा स्मृतीचिन्ह देवून सत्कार माधव बोरवणकर याच्या हस्ते करताना , डावीकडून डॉ . अजय फुलंबरकर , श्री . कळमकर , श्री बोरवणकर , व अनंत क्षीरसागर छायाचित्रात दिसत आहे .












