न्यूज पीसीएमसी नेटवर्क
चाकण (दि. २२ जुलै २०२५) :- महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत बोरदरा-आंबेठाण रस्त्यावर (दि .२१) मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास खंडणी मागण्याची घटना घडली आहे. फिर्यादी किरण सुरेश पडवळ (वय ३२), हे पॉकलैंड व जेसीबी मशिन ऑपरेटर असून ते सातीघर वस्ती, आंबेठाण येथे राहतात.
आरोपी निलेश ऊर्फ जग्गु नवनाथ मांडेकर (वय ३२, रा. आंबेठाण) याने फिर्यादी यांना जिवे मारण्याची धमकी देत “ट्रान्स्पोर्ट व्यवसाय चालू ठेवायचा असेल तर दरमहा २ लाख रुपये द्यावे लागतील,” अशी मागणी केली. या प्रकरणी आरोपीस अटक करण्यात आली असून भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०८(५), १२६(२), ३५१(३) अंतर्गत गुन्हा दाखल आहे. पोलिस उपनिरीक्षक जाधव तपास करत आहेत.












