न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पुणे (दि. २३ जुलै २०२५) :- पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी शहरातील १२ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या केल्या. पोलिस आयुक्तांनी काढलेल्या आदेशामध्ये चार गुन्हे निरीक्षकांची वरिष्ठ पोलिस निरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
त्याचवेळी चार वरिष्ठ पोलिस निरीक्षकांची वाहतूक शाखेत बदली करण्यात आली आहे. मुंबई, लोहमार्ग येथून पुणे शहर पोलिस दलात बदली झालेल्या पोलिस निरीक्षक अलका सरग यांची बाणेर ठाण्यात गुन्हे निरीक्षकपदी नियुक्ती केली.
बदल्या झालेले पोलिस निरीक्षक (त्यांचे सध्याचे ठिकाण) नवीन नियुक्तीचे पद…
संतोष पांढरे (गुन्हे शाखा) वपोनि, विश्रामबाग, विठ्ठल पवार (गुन्हे, उत्तमनगर) वपोनि, सहकारनगर, यशवंत निकम (सायबर) वपोनि, स्वारगेट, उत्तम भजनावळे (गुन्हे, सिंहगड रोड) वपोनि, चतुःशृंगी, विक्रमसिंग कदम (गुन्हे, कोथरूड) वपोनि खडकी, दिलीप फुलपगारे (वपोनि, खडकी) वाहतूक शाखा, विजयमाला पवार (वपोनि, विश्रामबाग) वाहतूक शाखा, राहुल गौड (वपोनि, सहकारनगर) वाहतूक शाखा, युवराज नांद्रे (वपोनि, स्वारगेट) वाहतूक शाखा, उल्हास कदम (वपोनि, चतुः श्रृंगी) गुन्हे, सिंहगड रोड, जितेंद्र कदम (गुन्हे, भारती विद्यापीठ) गुन्हे, विश्रामबाग, दत्ताराम बागवे (गुन्हे, खडकी) गुन्हे, विश्रांतवाडी.












