- दोन परदेशी नागरिकांसह अल्पवयीनावर गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ जुलै २०२५) :- पिंपरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका भारतीय नागरिकावर जबरदस्तीने ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यासाठी दबाव टाकल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी दोन परदेशी नागरिक Schaefer Javin Jacob (वय ४१, कॅलिफोर्निया, अमेरिका) आणि स्टीवन विजय कदम (वय ४६, पिंपरी) यांना अटक करण्यात आली असून एका विधी संघर्षग्रस्त बालकाला आईच्या ताब्यात देण्यात आले आहे.
फिर्यादी सनी बन्सीलाल दनानी (वय २७, पिंपरी) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, २७ जुलै रोजी सकाळी ११.३० च्या सुमारास आरोपींनी त्यांच्या घरी येऊन “प्रभू येशूच खरा देव आहे, इतर धर्म केवळ कथा आहेत” असे सांगून धर्मपरिवर्तनासाठी दबाव टाकला. तसेच धर्म स्वीकारल्यास सुख, शांती, संपत्ती आणि आर्थिक सहाय्य मिळेल, असे आमिष दाखवून धार्मिक भावना दुखावल्या.
या प्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम २९९, ३(५) आणि विदेशी नागरिक कायदा कलम १४(b)(c) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास निरीक्षक विजयानंद पाटील करीत असून दोन्ही आरोपींकडून दोन मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. पोलीस तपास सुरू आहे.













