- दोघांविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
काळेवाडी (दि. १ ऑगस्ट २०२५) :- काळेवाडी परिसरात जुन्या भांडणाच्या कारणावरून दोघा आरोपींनी एका व्यक्तीस मारहाण केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी काळेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांनुसार, ३१ जुलै २०२५ रोजी रात्री ९ वाजता श्रीकृष्ण कॉलनी, कोकणेनगर काळेवाडी येथे फिर्यादी गौडाप्पा हनुमंतराय पाटील (वय ३९) यांच्यावर आरोपी मल्लिनाथ विजयकुमार पाटील व सुनिल इरण्णा पाटील यांनी त्यांचे राहते घरासमोर येऊन शिवीगाळ केली व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. आरोपी क्रमांक १ ने लोखंडी फायटरने डोक्यात मारहाण करून फिर्यादीस जखमी केले. तसेच पोलिसांत तक्रार केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली.
या घटनेनंतर फिर्यादी यांनी तातडीने पोलिसांत धाव घेतली. काळेवाडी पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहिता कलम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोउपनि मेटे करत आहेत.


















