न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (१२ ऑगस्ट २०२५) :- आकुर्डीतील संभाजी चौकात भरधाव छोटा हत्ती टेम्पोने मोपेडला जोरदार धडक दिल्याने सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक किरकोळ जखमी झाले. हा अपघात सोमवार, ११ ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास घडला.
फिर्यादी आनंद भाऊ साळवी, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, निगडी पोलीस ठाणे, हे आपली यामाहा फसिनो मोटारसायकल घेऊन बिजलीनगरहून निगडीकडे जात होते. संभाजी चौकात उजवीकडे वळत असताना, भेळ चौकाकडून येणाऱ्या फिकट पिवळ्या रंगाच्या छोटा हत्ती टेम्पोने, वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवून, समोरून जोरदार धडक दिली.
अपघातात मोटारसायकलचे नुकसान झाले असून फिर्यादी किरकोळ जखमी झाले आहेत. आरोपी टेम्पोचालक अज्ञात असून त्याला अद्याप अटक करण्यात आलेली नाही. निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पुढील तपास पोहवा वीर करत आहेत.












