न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (१२ ऑगस्ट २०२५) :- पिंपळे सौदागरच्या मॅक्स शोरूमसमोर बीआरटी बस मार्गाच्या रेलिंगवर भरधाव बाईक आदळून झालेल्या अपघातात तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना शनिवार, ९ ऑगस्ट रोजी रात्री अंदाजे ११.२५ वाजता घडली.
मयताची ओळख वेदांत बबन मुसने (वय २३, रा. पिंपळे सौदागर) अशी आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, वेदांत आपल्या ताब्यातील केटीएम बाईकवर भरधाव वेगाने कोकणे चौकाकडून भोसरीकडे जात असताना मॅक्स शोरूमसमोर विरुद्ध बाजूस असलेल्या बीआरटी बस मार्गाच्या विलगीकरण रेलिंगवर जोरात धडकला. धडकेची तीव्रता इतकी होती की तो रेलिंगवरून उडाला व गंभीर जखमी होऊन जागीच मृत्यू झाला.
अपघातात बाईकचेही मोठे नुकसान झाले. या प्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोउपनि चापाले करत आहेत.












