न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ ऑगस्ट २०२५) :- पिंपरीतील आयसीआयसीआय बँक ऑटोक्लस्टर शाखेत बनावट नोटा जमा करण्याचा प्रकार उघडकीस आला असून याप्रकरणी अज्ञात इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आनंद मेडिको या होलसेल मेडिकल दुकानातील कर्मचारी भास्कर सखाराम खोपकर यांनी मालक आनंद सुरेश गांधी यांच्याकडून 80,100 रुपयांची रक्कम बँकेत जमा करण्यासाठी घेतली होती. ही रक्कम कॅशियर प्रवीण विवेक क्षीरसागर यांनी तपासणीसाठी ग्लोरीकॅश सॉर्टिंग मशीनमध्ये घातली असता, 200 रुपयांच्या 9 नोटा बनावट असल्याचे आढळले.
विचारणा केली असता आनंद गांधी यांनी सांगितले की, त्यांचा होलसेल औषध व्यवसाय असून सुमारे 90 ते 100 रिटेलर दुकानदारांना ते औषधे पुरवतात. त्यामुळे बनावट नोटा कोणाकडून आल्या, याबाबत त्यांना खात्री नाही.
संत तुकारामनगर पोलीस ठाण्यात भा.दं.सं. कलम 179 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.












