- महाळुंगेत भरधाव ट्रक चालकाने घेतला रियाचा बळी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
महाळुंगे (दि. १३ ऑगस्ट २०२५) :- महाळुंगे एमआयडीसी परिसरात भरधाव व बेदरकार ट्रक चालविल्यामुळे एका 18 वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला. या प्रकरणी ट्रकचालकाला अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. 12 ऑगस्ट रोजी सकाळी साडेनऊच्या सुमारास महाळुंगे ते निघोजे रस्त्यावर, स्कोडा व्होक्सवॅगन कंपनीजवळ, आरोपी गजानन मारुती पानचावरे (रा. उरुळी देवाची) हा आयशर ट्रक भरधाव, वाकडा-तिकडे व धोकादायक पद्धतीने चालवत होता. वळणावर ट्रकचा तोल जाऊन तो पायी चालत असलेल्या रिया जयप्रकाश सहाणी (वय 18) हिच्यावर पलटी झाला.
अपघातात रियाचा हात, पाय, चेहरा आणि शरीरावर गंभीर दुखापत होऊन तिचा जागीच मृत्यू झाला. फिर्यादी राहुल जयप्रकाश सहाणी हा तीचा भाऊ असून त्यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलिसांत तक्रार दिली.
या प्रकरणी भा.दं.सं. कलम व मोटार वाहन कायद्याच्या कलम अंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात आली आहे.












