- अशी आहे तब्बल ३२ प्रभागांची यादी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी | दि २२ ऑगस्ट २०२५ :– पिंपरी-चिंचवड महापालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ साठी प्रभाग रचना जाहीर करण्यात आली आहे. नगरविकास विभागाच्या आदेशानुसार एकूण लोकसंख्या १७ लाख ३९ हजार ६९९ वरून महापालिकेतील सदस्यसंख्या १२८ निश्चित झाली आहे. यासाठी शहरात एकूण ३२ प्रभागांची रचना करण्यात आली असून प्रत्येक प्रभागात चार सदस्यीय पद्धती ठेवण्यात आली आहे.
नगरविकास विभागाने जारी केलेल्या आदेशानुसार, प्रभाग रचनेबाबत निश्चित वेळापत्रक आखण्यात आले आहे. २२ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर २०२५ या कालावधीत प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध करून नागरिकांकडून हरकती मागविण्यात येतील.
त्यानंतर ५ ते १२ सप्टेंबर २०२५ दरम्यान शासन नियुक्त अधिकारी सुनावणी घेतील. सुनावणीनंतरचा अहवाल १३ ते १५ सप्टेंबर २०२५ दरम्यान नगरविकास विभागाला सादर केला जाईल. पुढे १६ ते २२ सप्टेंबर २०२५ दरम्यान नगरविकास विभागाकडून राज्य निवडणूक आयोगाकडे अंतिम प्रस्ताव पाठविण्यात येणार असून, ३ ते ६ ऑक्टोबर २०२५ या दरम्यान राज्य निवडणूक आयोग अंतिम प्रभाग रचना अधिसूचनेद्वारे जाहीर करणार आहे.
प्रभागनिहाय क्षेत्रांची यादी…
प्रभाग क्रमांक एक – चिखली गावठाण भाग, पाटीलनगर, गणेशनगर, मोरेवस्ती भाग, सोनवणे वस्ती, ऐश्वर्यम कोर्टयार्ड, शाईन सिटी इमारत इत्यादी.
प्रभाग क्रमांक दोन – चिखली गावठाण भाग, रिव्हर रेसिडन्सी, क्रिस्टल सिटी, स्वराज रेसिडन्सी, गंधर्व एक्सलन्स, बनकर वस्ती, बोऱ्हाडेवाडी, वुडस व्हिला, जाधववाडी, राजे शिवाजीनगर, कुदळवाडी भाग इत्यादी.
प्रभाग क्रमांक तीन – मोशी गावठाण, गंधर्वनगरी, संत ज्ञानेश्वरनगर भाग, साई मंदिर परिसर, गोखले मळा, अलंकापुरम सोसायटी, वडमुखवाडी, काळजेवाडी, पठारेमळा, ताजणेमळा, चोवीसावाडी, चहोली, डुडुळगाव इत्यादी.
प्रभाग क्रमांक चार
भाग १ – दिघी गजानन महाराज नगर, भारतमाता नगर, गायकवाडनगर, भंडारी स्कायलाईन, साई पार्क, समर्थनगर, कृष्णानगर, रुणवाल पार्क, विजयनगर, दिघी गावठाण, काटे वस्ती इत्यादी.
भाग २ – व्ही.एस.एन.एल. गणेशनगर, रामनगर, बोपखेल गावठाण इत्यादी.
प्रभाग क्रमांक पाच – रामनगर, तुकारामनगर, गुरुदत्त कॉलनी, गंगोत्री पार्क, सावंतनगर, महादेवनगर, गवळीनगर, श्रीराम कॉलनी, ज्ञानेश्वर नगर, चक्रपाणी वसाहत भाग इत्यादी.
प्रभाग क्रमांक सहा – धावडेवस्ती, भगत वस्ती, गुळवेवस्ती, चक्रपाणी वसाहत भाग, पांडवनगर, रोशल गार्डन परिसर, सदगुरूनगर इत्यादी.
प्रभाग क्रमांक सात – शितलबाग, सेंच्युरी एन्का कॉलनी, सुविधा पार्क, आपटे कॉलनी, सॅन्डवीक कॉलनी, खंडोबामाळ, गव्हाणे वस्ती, भोसरी गावठाण, लांडेवाडी, शांतीनगर इत्यादी.
प्रभाग क्रमांक आठ – जय गणेश साम्राज्य, जलवायु विहार, केद्रीय विहार, पीएमआरडीए सेक्टर १२ गृहप्रकल्प, संत नगर, महाराष्ट्र कॉलनी, इंद्रायणीनगर, खंडेवस्ती, गवळीमाथा, बालाजीनगर इत्यादी.
प्रभाग क्रमांक नऊ – टाटा मोटर्स, यशवंतनगर, विठ्ठलनगर, उद्यमनगर, स्वप्ननगरी, पंतप्रधान आवास योजना, अंतरीक्ष सोसायटी, अजमेरा सोसायटी, वास्तूउद्योग, मासुळकर कॉलनी, महिंद्रा रॉयल, खराळवाडी, गांधीनगर, नेहरुनगर, महिंद्रा अँन्थिया हौसिंग सोसायटी इत्यादी.
प्रभाग क्रमांक दहा – संत ज्ञानेश्वर नगर (म्हाडा), मोरवाडी, लालटोपीनगर, अमृतेश्वर कॉलनी, इंदिरानगर, सरस्वती विश्व विद्यालय परिसर, आंबेडकर नगर, एच.डी.एफ.सी कॉलनी, दत्तनगर, विद्यानगर, शाहूनगर, वृंदावन सोसायटी, संभाजीनगर इत्यादी.
प्रभाग क्रमांक अकरा – नेवाळे वस्ती, हरगुडे वस्ती, कुदळवाडी भाग, कृष्णानगर, शरदनगर, कोयनानगर, महात्मा फुलेनगर, पुर्णानगर, शिवाजी पार्क, शिवतेजनगर, म्हेत्रे वस्ती, स्वस्त घरकुल प्रकल्प, अजंठानगर, दुर्गानगर इत्यादी.
प्रभाग क्रमांक बारा – तळवडे गावठाण, एम.आय.डी.सी., आय.टी. पार्क, ज्योतीबा मंदिर परिसर, सहयोगनगर, रुपीनगर, त्रिवेणीनगर म्हेत्रे वस्ती भाग, ताम्हाणे वस्ती भाग, शिवसृष्टी सोसायटी परिसर तळवडे इत्यादी.
प्रभाग क्रमांक तेरा – निगडी गावठाण, सेक्टर २२ ओटास्किम, यमुनानगर, माता अमृतानंदमयी मठ परिसर, श्रीकृष्ण मंदिर परिसर, साईनाथनगर इत्यादी.
प्रभाग क्रमांक चौदा – चिंचवड स्टेशन, महावीर पार्क, मोहननगर, रामनगर, काळभोर नगर, ऐश्वर्यम सोसायटी, शुभश्री सोसायटी, दत्तवाडी, तुळजाईवस्ती, जयगणेश व्हिजन, विवेकनगर, विठ्ठलवाडी, बजाज ऑटो इत्यादी.
प्रभाग क्रमांक पंधरा – आकुर्डी गावठाण, गंगानगर, वाहतूक नगरी, सेक्टर क्रमांक २४ ते २८, सिंघूनगर, परमार पार्क, स्वप्नपूर्ती सोसायटी, केंद्रीय वसाहत, एलआयसी, एक्साईज इत्यादी.
प्रभाग क्रमांक सोळा – वाल्हेकरवाडी भाग, गुरुद्वारा, नॅनोहोम सोसायटी, शिंदे वस्ती, रॉयल कासा सोसायटी, सेक्टर क्रमांक २९, रावेत, नंदगिरी सोसायटी, विकासनगर, क्रिस्टल सिटी, के.व्हीले सोसायटी, के.टाऊन सोसायटी, सिल्व्हर ग्रेसिया सोसायटी, भालचंद्र विहार, सेलेस्टीयल सिटी फेज २, फेलिसिटी सोसायटी, मामुर्डी, किवळे इत्यादी.
प्रभाग क्रमांक सतरा – दळवीनगर, प्रेमलोक पार्क, भोईर नगर, गिरीराज सोसायटी, रेलविहार सोसायटी भाग, शिवनगरी, नागसेननगर, आहेरनगर, वाल्हेकरवाडी गावठाण, चिंचवडेनगर, बळवंतनगर, बिजलीनगर इत्यादी.
प्रभाग क्रमांक अठरा – एस.के.एफ. कॉलनी, रस्टन कॉलनी, पवना नगर, वेताळनगर, चिंचवड गावठाण, केशवनगर, तानाजीनगर, काकडे पार्क, मोरया राज पार्क, दर्शन हॉल, माणिक कॉलनी, लक्ष्मीनगर, यशोपुरम सोसायटी इत्यादी.
प्रभाग क्रमांक एकोणीस – विजयनगर, न्यू एस.के.एफ कॉलनी, उद्योगनगर, क्वीनस् टाऊन, सुदर्शननगर, श्रीधरनगर, आनंदनगर, भोईर कॉलनी, गावडे पार्क, एम्पायर इस्टेट, विस्डम पार्क, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलनी भाग, भिमनगर, निराधारनगर, सग्राट अशोकनगर, माता रमाबाई आंबेडकरनगर, बौध्दनगर, वाल्मीकीनगर, सॅनीटरी चाळ, भाटनगर, भाजी मंडई, पिंपरी कॅम्प इत्यादी.
प्रभाग क्रमांक वीस – विशाल थिएटर परिसर, एच.ए. कॉलनी, महेशनगर, संत तुकारामनगर, महात्मा फुलेनगर, वल्लभनगर, लांडेवाडी झोपडपट्टी, सी.आय.आर.टी., पार्श्वनाथ सोसायटी, कासारवाडी भाग, अग्रसेननगर, कुंदननगर भाग इत्यादी.
प्रभाग क्रमांक एकवीस – मिलिंदनगर, सुभाषनगर, गौतमनगर, आदर्शनगर, इंदिरानगर, शास्त्रीनगर, बलदेवनगर, गणेशनगर, जिजामाता हॉस्पिटल, संजय गांधीनगर, वैभवनगर, अशोक थिएटर, वैष्णोदेवी मंदिर, मासुळकर पार्क, पिंपरीगाव, तपोवन मंदिर, बालामल चाळ, कैलासनगर, ज्ञानेश्वरनगर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलनी भाग इत्यादी.
प्रभाग क्रमांक बावीस – काळेवाडी, विजयनगर, आदर्शनगर, पवनानगर, ज्योतीबा नगर भाग, नढेनगर, कोकणे नगर, राजवाडे नगर इत्यादी.
प्रभाग क्रमांक तेवीस – प्रसुनधाम, गंगा आशियाना, कुणाल रेसिडेन्सी, स्विस कॉऊंटी, थेरगाव गावठाण, पडवळनगर भाग, पवार नगर, बापुजी बुवा नगर, जयमल्हार नगर भाग, धनगर बाबा मंदिर परिसर, अशोका सोसायटी, साईनाथनगर, समर्थ कॉलनी इत्यादी.
प्रभाग क्रमांक चोवीस – अदित्य बिर्ला हॉस्पिटल, दत्तनगर, पद्मजी पेपरमिल, ग्रिन्स हाऊसिंग सोसायटी, गंगा ओशियन मिडोज, पडवळनगर भाग, गणेशनगर, म्हतोबानगर, प्रथम सोसायटी, क्रांतीनगर, महाराष्ट्र कॉलनी, यशदा कॉलनी, गुजरनगर, मंगलनगर, बेलठिकानगर भाग इत्यादी.
प्रभाग क्रमांक पंचवीस – माळवाडी, पुनावळे, पंढारे वस्ती, काटेवस्ती, नवले वस्ती, ताथवडे, अशोकानगर, निंबाळकरनगर, भुमकरवस्ती, वाकड, काळा-खडक मुंजोबानगर, मानेवस्ती, भुजबळ वस्ती, वाकडकर वस्ती, केमसे वस्ती, रोहन तरंग सोसायटी, प्रिस्टाईन सोसायटी, स्वरा प्राईड रेसीडेन्सी इत्यादी.
प्रभाग क्रमांक सव्वीस – पिंपळे निलख, विशालनगर, पार्क स्ट्रीट, कस्पटेवस्ती, अनमोल रेसिडेन्सी, धनराज पार्क, दत्तमंदीर परिसर, अण्णाभाऊ साठेनगर, वेणुनगर भाग, रक्षक सोसायटी, भारत इलेक्ट्रॉनिक्स इत्यादी.
प्रभाग क्रमांक सत्तावीस – तापकीरनगर, श्रीनगर, शिवतीर्थनगर, बळीराम गार्डन, रहाटणी गावठाण, तांबे शाळा परिसर, सिंहगड कॉलनी, रायगड कॉलनी, लक्ष्मीबाई तापकीर शाळा परिसर, एस.एन.बी.पी. स्कूल परिसर, रॉयल ऑरेंज काऊंटी, आकाशगंगा सोसायटी इत्यादी.
प्रभाग क्रमांक अठ्ठावीस – फाईव्ह गार्डन, शिवार गार्डन, प्लनेट मिलेनीयम, कापसे लॉन, रामनगर, पिंपळे सौदागर, कुणाल आयकॉन, रोझ लँड, गोविंद गार्डन इत्यादी.
प्रभाग क्रमांक एकोणतीस – कल्पतरू इस्टेट, क्रांतीनगर, काशिद पार्क, गगनगिरी पार्क, जवळकरनगर, शिवनेरी कॉलनी, गुलमोहर कॉलनी, ओंकार कॉलनी, श्रीकृष्ण नगर, गोकुळ नगरी, भालेकरनगर, पिंपळेगुरव, सुदर्शन नगर, वैदूवस्ती इत्यादी.
प्रभाग क्रमांक तीस – शंकरवाडी भाग, सरीता संगम सोसायटी, शास्त्रीनगर, केशवनगर, कासारवाडी भाग, हिराबाई लांडगे झोपडपट्टी, जवळकर कॉलनी, फुगेवाडी, संजयनगर, दापोडी, सिध्दार्थ नगर, गणेशनगर, सुंदरबाग कॉलनी, एस.टी. वर्कशॉप, आनंदवन, एस.एम.एस कॉलनी, जयभिमनगर, महात्मा फुले नगर इत्यादी.
प्रभाग क्रमांक एकतीस
भाग १ – राजीव गांधीनगर, गजानन महाराज नगर, किर्ती नगर, विनायकनगर, गणेशनगर, कवडेनगर, मयुरनगरी, रामनगर, गांगार्डेनगर भाग, विद्यानगर, ज्ञानेश पार्क, स्वामी विवेकानंद नगर, समता नगर, राजाराम नगर, ढोरे पाटील फार्म, सीएमई कॉलनी, संत तुकारामनगर, आनंद पार्क भाग इत्यादी.
भाग २ – ऊरो रुग्णालय.
प्रभाग क्रमांक बत्तीस – सांगवी गावठाण, कुंभार वाडा, गंगानगर, आनंदनगर, मधुबन सोसायटी, ढोरेनगर, पवारनगर, शिंदेनगर, मुळानगर, लक्ष्मीनगर, चंद्रमणी नगर, जयमालानगर, उषकाल सोसायटी, पवनानगर, संगमनगर, प्रियदर्शनी नगर, पी.डब्ल्यू.डी. कॉलनी, एस.टी. कॉलनी, ममतानगर, शितोळेनगर, पुष्पापार्क, कृष्णानगर, साईराज रेसीडेन्सी, सह्याद्री कॉलनी, श्रीनगर, बासिलिओ सोसायटी, शिवदत्तनगर, शिवरामनगर इत्यादी.
पुढील दिशा…
प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर नागरिकांकडून हरकती व सूचना नोंदवून घेण्यात येतील. त्यानंतर राज्य निवडणूक आयोग अंतिम अधिसूचना प्रसिद्ध करणार असून याच रचनेवरून येणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीतील मतदारसंघ व उमेदवार निश्चित होणार आहेत.












