न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ४ सप्टेंबर २०२५) :- न्यू सिटी प्राईड स्कूलमध्ये शिक्षक दिन मोठ्या उत्साहात आणि आनंदी वातावरणात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला शाळेचे चेअरमन मा. अरुण चाबुकस्वार सर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. शाळेचे उपप्राचार्य श्री. सचिन कळसईत सर व तात्या शिनगारे हे मान्यवर विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुंदर सुत्रसंचालन विद्यार्थिनी त्रिवेणी जाधव व स्वराली शिंदे यांनी केले. विद्यार्थ्यांनी शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त करणारी मनोगते तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांचे मन जिंकले.
शेवटी आभारप्रदर्शन विद्यार्थी सोहम गायकवाड याने केले. कार्यक्रमाला शिक्षकवर्ग, विद्यार्थी व पालकांची उपस्थिती लाभली होती.











