- निर्माल्य संकलन व वाहतूक नियोजनात स्वयंसेवकांची मोलाची भूमिका..
- एसपीओ आणि पोलिस मित्रांच्या सहकार्याने विसर्जन घाटांवर शिस्तबद्ध व्यवस्था…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी, (दि. ८ सप्टेंबर २०२५) :- पिंपरी-चिंचवड शहरातील गणेशोत्सव सोहळा मोठ्या धामधुमीत संपन्न झाला. विसर्जन सोहळ्यादरम्यान शहरातील विविध घाटांवर गणेशभक्तांची मोठी गर्दी झाली होती. प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीच्या (पीएनएसकेएस) स्वयंसेवकांनी निर्माल्य संकलन व बंदोबस्तामध्ये प्रशासनाला मोलाचे सहकार्य केले.
गणेश तलाव, चिखली घाट, चिंचवड, वाल्हेकरवाडी, रावेत, शाहूनगर या परिसरांमध्ये समितीचे स्वयंसेवक तसेच विशेष पोलिस अधिकारी कार्यरत होते. वाहनांची योग्य पार्किंग व्यवस्था व वाहतुकीचे नियोजन असल्यामुळे कोठेही वाहतूक कोंडी झाली नाही. एसपीओंनी मध्यरात्री उशिरापर्यंत बंदोबस्ताचे काम पाहिले.
वाहतूक विभागाचे उपायुक्त विवेक पाटील, चिखली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल साळुंखे, निगडी वाहतूक विभागाचे निरीक्षक सुदाम पाचोरकर, पोलीस उपनिरीक्षक महादेव धनगर यांच्या मार्गदर्शनाखाली विसर्जन सोहळा पार पडला. समितीचे अध्यक्ष डॉ. विजयकुमार पाटील यांच्या नेतृत्वाखाली स्वयंसेवकांनी कामकाज केले.
विभाग प्रमुख म्हणून विशाल शेवाळे, संतोष चव्हाण, सतीश देशमुख, राजेंद्र येळवंडे, राम सुर्वे, तेजस सकट, देवजी सापरिया, उद्धव कुंभार, राजेंद्र कुंवर, बाबुराव खोटे, अजित भगत, दत्तात्रय चव्हाण, अनिल मोरे, महेश शिंदे, राहुल चौधरी, लक्ष्मण इंगवले, शशिकांत इंगळे, सुभाष माने, भरत उपाध्ये, लहू पाटील, प्रकाश पानस्कर, अंकुश पाटील, संभाजी गुंजाळ, दत्ता पोळ, राजेश हजारे, निलेश ढेकाने व संजय कांबळे यांनी जबाबदाऱ्या पार पाडल्या.
या प्रसंगी डॉ. पाटील म्हणाले, “गेल्या २४ वर्षांपासून पीएनएसकेएस संस्थेचे सदस्य पोलिस मित्र, एसपीओ व स्वयंसेवकांच्या माध्यमातून गणेशोत्सव काळात प्रशासनाला सहकार्य करत आहेत. यंदा प्राधिकरण गणेश तलाव परिसरात ४५०० घरगुती व १२ सार्वजनिक गणपतींचे विसर्जन झाले. तर संपूर्ण शहरात सुमारे पावणे दोन लाख गणेश मूर्तींचे विसर्जन पार पडले,” अशी माहिती त्यांनी दिली.












