- ३०० हून अधिक नागरिकांचा सहभाग..
- तपासण्या, तज्ज्ञ मार्गदर्शन आणि औषधांचे मोफत वितरण…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी, (दि. 8 सप्टेंबर 2025) :- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागातर्फे नेहरूनगर येथे मोफत महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात ३०० हून अधिक नागरिकांनी सहभाग घेऊन वैद्यकीय सेवा, तपासण्या आणि उपचारांचा लाभ घेतला.
महापालिका आयुक्त शेखर सिंह आणि अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली शिबिराचे उद्घाटन आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांनी केले. या प्रसंगी डॉ. अभयचंद्र दादेवार, अजिंक्य येळे, डॉ. छाया शिंदे, डॉ. गोविंद नरके यांच्यासह वायसीएम हॉस्पिटलचे तज्ज्ञ डॉक्टर, आशा सेविका आणि परिचारिका उपस्थित होते.
शिबिरात रक्त तपासणी, लसीकरण, एक्स-रे, गरोदर मातांची तपासणी, आभा व आयुष्मान कार्ड नोंदणी अशा सुविधा उपलब्ध होत्या. बालरोग, स्त्रीरोग, नेत्ररोग, दंतरोग तसेच नाक-कान-घसा तज्ज्ञांचे मार्गदर्शन नागरिकांना मिळाले. आवश्यक औषधांचे मोफत वितरणही करण्यात आले.
“महापालिकेच्या अशा शिबिरांमुळे सर्वसामान्यांना वैद्यकीय सुविधा सहज उपलब्ध होतात,” असे खोराटे म्हणाले. तर डॉ. गोफणे यांनी “महाआरोग्य शिबिरांमुळे नागरिकांना वेळेत तपासणी व उपचार मिळतात,” असे सांगितले.












