न्यूज पीसीएमसी नेटवर्क
चिंचवड (दि. २४ सप्टेंबर २०२५) :- चिंचवड येथील गणेशपेठ मोरया गोसावी मंदिराजवळ कुटुंबातील वादातून झालेल्या हाणामारीप्रकरणी तब्बल १२ जणांविरोधात चिंचवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात आरोपींनी फिर्यादी व त्याच्या कुटुंबीयांवर लाठी-काठ्यांनी हल्ला करून मारहाण केली व जीव घेण्याची धमकी दिली.
फिर्यादी दत्तात्रय गंगाराम चिंचवडे (वय ५१, व्यवसाय शेती, रा. चिंचवड) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, दि. २१ सप्टेंबर रोजी दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास आरोपींनी घरासमोर येऊन वाद सुरू केला. फिर्यादीचा मुलगा सिद्धाश याने याआधी बैल मंदिरात नेल्याच्या रागातून हा प्रकार घडला.
आरोपींमध्ये दिनकर रामचंद्र चिंचवडे (४५), मयुर राजेंद्र चिंचवडे (३५), सागर राजेंद्र चिंचवडे (३३), सुनील रामचंद्र चिंचवडे (५५), शुभम सुनील चिंचवडे (२४), आदित्य दिनकर चिंचवडे (२०), नितीन रामचंद्र चिंचवडे (४२), भुषण विजय चिंचवडे (४५), मंतन नितीन चिंचवडे (२१), भारत विजय चिंचवडे (४०), अजय माऊली चिंचवडे (४८), संकेत दत्तात्रय चिंचवडे (२२) यांचा समावेश आहे.
या सर्वांनी मिळून फिर्यादी दत्तात्रय चिंचवडे, त्यांची मुले आकाश व सिद्धाश, तसेच पुतण्या किरण चिंचवडे व पुतणी यांना लाठी-काठ्यांनी व ठोश्याबुक्यांनी मारहाण केली. यात फिर्यादी व त्यांची मुले किरकोळ जखमी झाले. तसेच फिर्यादीची पत्नी व भावजयींना शिवीगाळ करून जीव घेण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद आहे.
या प्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोउपनि बळिप यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.












