- प्रभाग क्रमांक २२ साठी शहराध्यक्षांकडे उमेदवारी अर्ज दाखल..
- कार्यकर्ते आणि नागरिकांत उमेदवारीची चर्चा जोरात…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. १० डिसेंबर २०२५) :- पिंपरी चिंचवड महापालिकेची निवडणुक जाहीर होताच सर्वच पक्षांमध्ये तिकीट मिळवण्यासाठी इच्छुकांची रस्सीखेच सुरू झाली आहे. विशेषतः भारतीय जनता पक्षाकडे सर्वाधिक इच्छुक उमेदवारीसाठी पुढे येत असून, पक्षाने ९ आणि १० डिसेंबर रोजी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागितले आहेत. अर्ज जमा करण्याची प्रक्रियाही सुरू केली आहे.
दरम्यान प्रभाग क्रमांक २२ मधून सोमनाथ तापकीर यांनी मंगळवारी ९ डिसेंबर २०२५ रोजी मोठ्या उत्साहात आपला उमेदवारी अर्ज पिंपरी-चिंचवड शहर भाजप जिल्हाध्यक्ष शत्रुघ्न बापू काटे यांच्या हस्ते सुपूर्त केला.
प्रभाग क्रमांक २२ मध्ये सोमनाथ तापकीर यांचे गेल्या अनेक वर्षांपासून उल्लेखनीय समाजकारण सुरू आहे. प्रभागातील जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी ते नेहमीच पुढाकार घेत असल्यामुळे नागरिक त्यांच्यावर विशेष विश्वास ठेवतात. पाणी, सांडपाणी, रस्ते, वीज यांसारख्या स्थानिक अडचणींसाठी नागरिक सरळ तापकीर यांच्या संपर्कात येतात आणि ते प्रश्न मार्गी लावण्यासाठी तत्परतेने कार्य करतात.
त्यांच्या सातत्यपूर्ण कामगिरीला आणि पक्षनिष्ठेला ओळखूनच पक्षश्रेष्ठींनी त्यांना रहाटणी–पिंपळे सौदागर मंडळ अध्यक्षपदाची जबाबदारी दिलेली आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत भाजपची उमेदवारी सोमनाथ तापकीर यांच्याच नावावर निश्चित होण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात असून, प्रभागात त्यांच्या उमेदवारीभोवती चांगलीच चर्चा सुरू आहे.












