- महिलांचा सन्मान, तरुणांना संधी आणि ज्येष्ठांना सुविधा या तिन्ही गोष्टी माझ्या कामाचा केंद्रबिंदू – कोमलताई काळे…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
काळेवाडी (दि. 04 जानेवारी 2025) :- पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुक 2026 पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत उमेदवार ब) कोमलताई सचिन काळे यांचा प्रभाग क्रमांक २२ मधून जोमात प्रचार सुरू आहे. काळेवाडी, विजयनगर, आदर्शनगर, पवनानगर, ज्योतीबा नगर, नढेनगर, कोकणे नगर आणि राजवाडेनगर या भागांमध्ये संपर्क अभियान आणि संवाद कार्यक्रमांतून त्यांचा प्रचार वेग घेत आहे.
त्यांच्या पॅनलमधील भाजपचे उमेदवार अ) पाडळे निता विलास, क) विनोद जयवंत नढे आणि ड) हर्षद सुरेश नढे हेही नागरिकांशी थेट संवाद साधत स्थानिक प्रश्न ऐकून घेण्यावर भर देत आहेत.
स्वच्छ रस्ते, पाणीपुरवठा, वाहतूक सुसूत्रीकरण, महिलांसाठी सुरक्षित सुविधा आणि तरुणांसाठी क्रीडा-सांस्कृतिक उपक्रम अशी अनेक विकासकामे करण्याचा संकल्प पॅनलने व्यक्त केला आहे.
कोमलताई मतदारांना आवाहन करताना म्हणाल्या, “प्रभाग २२ हा माझ्यासाठी कुटुंबासारखा आहे. नागरिकांनी दाखवलेला विश्वास हीच माझी ताकद आहे. प्रामाणिकपणे आणि पारदर्शक काम करीत प्रत्येक भागाचा सर्वांगीण विकास घडवण्याचं वचन देते. महिलांचा सन्मान, तरुणांना संधी आणि ज्येष्ठांना सुविधा या तिन्ही गोष्टी माझ्या कामाचा केंद्रबिंदू असतील.”












