- पदयात्रा, प्रचाररॅली आणि संवादातून वाकडमध्ये स्नेहाताईंचा प्रचार वेगात…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
वाकड (दि. 04 जानेवारी 2025) :- पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग २६ मध्ये भारतीय जनता पक्षाच्या प्रचाराला वेग आला आहे. प्रचाराची रणधुमाळी सुरू झाल्याने पदयात्रा, भेटीगाठी आणि प्रचार फेऱ्यांमध्ये नागरिकांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग दिसून येत आहे. नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादावरून भाजपच्या पॅनेलच्या विजयाची नांदी घुमत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
भाजपच्या क) गटाच्या अधिकृत उमेदवार स्नेहा रणजित कलाटे यांनी शनिवारी विशालनगर परिसरातील ओवळ स्प्रिंग, अक्षय नगर फेज-१, एपिक सोसायटी, फ्रीडम पार्क, निकोस्काय, अशोक हेरिटेज, ओंकार रेसिडेन्सी, श्वेतागण श्री मंगलमुर्ती सोसायटी आदी ठिकाणी भेट देत मतदारांशी संवाद साधला. तसेच वाकड येथील कासा पोली सोसायटीजवळील जैन मंदिरात सदिच्छा भेट देऊन महावीर भगवानांचे दर्शन घेतले.
या भेटीदरम्यान मतदारांनी मांडलेल्या समस्या, सूचना आणि अपेक्षा शांतपणे ऐकून घेत त्या सोडविण्याचा ठोस शब्द स्नेहा कलाटे यांनी नागरिकांना दिला. केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात सुरू असलेल्या विकासकामांचा उल्लेख करत “सबका साथ, सबका विकास” या घोषणेनुसार प्रभागाचा सर्वांगीण विकास वेगाने पुढे नेण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला.
नागरिकांच्या विश्वास, सहकार्य आणि सहभागाच्या जोरावर प्रभाग २६ मध्ये भाजपचे कमळ ताकदीने फुलणार, असा आत्मविश्वास पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.












