- प्रभाग क्रमांक २२ मध्ये भाजपच्या उमेदवारांकडून विकासाचा मुद्दा केंद्रस्थानी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
काळेवाडी (दि. ०६ जानेवारी २०२६) :- काळेवाडी, विजयनगर, आदर्शनगर, पवनानगर, ज्योतीबा नगर, नढेनगर, कोकणे नगर आणि राजवाडेनगर या प्रभाग क्रमांक २२ मध्ये भारतीय जनता पक्षाचा प्रचार वेग घेत आहे. ड जागेवरील अधिकृत उमेदवार हर्षद सुरेश नढे यांच्यासह भाजपचे अ) पाडळे निता विलास, ब) कोमलताई सचिन काळे आणि क) विनोद जयवंत नढे यांचा मतदारांवर प्रभाव वाढत असून प्रत्यक्ष संवादाद्वारे विकासाचा अजेंडा मतदारांपर्यंत पोहोचवताना दिसत आहेत.
सोमवार (दि. ०५) रोजी विजयनगर येथील शांती कॉलनी १, २ व ३ परिसरात काढलेल्या प्रचार फेरीत उमेदवारांच्या “चार बटणे कमळाची – पाच वर्षे विकासाची” ही घोषणा दणाणून गेली. दिली. रस्ते, स्वच्छता, पाणीपुरवठा, प्रकाश व्यवस्था आणि सार्वजनिक सोयी याबाबतचे नियोजन नागरिकांसमोर मांडण्यात आले.
हर्षद नढे म्हणाले, “या प्रभागाचा सर्वांगीण विकास हा आमचा एकमेव अजेंडा आहे. प्रत्येक रस्ता सुरक्षित, प्रत्येक गल्ली स्वच्छ आणि प्रत्येक घरापर्यंत पाणी व मूलभूत सुविधा पोहोचणे हे लक्ष्य आम्ही ठरवले आहे. नागरिकांनी सांगितलेल्या तक्रारी तातडीने नोंदवत आहोत आणि त्यावर प्राधान्यक्रमाने उपाययोजना करू. प्रभागाचा चेहरा बदलणे हेच आमचे वचन आहे.”
येत्या १५ जानेवारी रोजी होणाऱ्या निवडणुकीत मोठ्या संख्येने ‘कमळ’ या चिन्हाला मतदान करून लोकशाही मजबूत करा, असे आवाहन त्यांनी मतदारांना केले. प्रचारात पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त सहभाग होता, तर अनेक ठिकाणी नागरिकांकडून उमेदवारांचे स्वागत करण्यात आले.












