- जनतेचा विश्वास आणि साथ मिळाली, तर प्रभागात ठोस बदल घडवणार – अर्चनाताई विनोद तापकीर…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
रहाटणी (दि. ०६ जानेवारी २०२६) :-पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीसाठी येत्या १५ जानेवारी रोजी मतदान होत आहे. या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २७ (रहाटणी–तापकीरनगर–श्रीनगर) येथे चिंचवड विधानसभेचे आमदार शंकर जगताप यांच्या उपस्थितीत सोमवारी प्रचार यात्रा काढण्यात आली.
आमदार जगताप म्हणाले, “मतदान हा विकासाचा मजबूत आधार आहे. भाजपचे धोरण पारदर्शक प्रशासन, नियोजनबद्ध विकास आणि सर्वसामान्यांपर्यंत सेवा पोहोचविणे असे आहे. नागरिकांनी घराघरातून बाहेर पडून मतदान करावे आणि प्रभागाच्या प्रगतीसाठी योग्य निर्णय घ्यावा.”
भाजपचे अधिकृत उमेदवार क) अर्चनाताई विनोद तापकीर आणि ड) चंद्रकांत (आण्णा) बारकू नखाते यांच्या प्रचार यात्रेत आमदार जगताप सहभागी झाले. काळेवाडी, ज्योतिबा नगर आणि तापकीर नगर परिसरात काढलेल्या यात्रेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
अर्चनाताई विनोद तापकीर म्हणाल्या, “रस्ते, स्वच्छता, पाणीपुरवठा आणि महिलांसाठी सुरक्षित सुविधा या मुद्द्यांवर सातत्याने काम करणार आहोत. जनतेचा विश्वास आणि साथ मिळाली, तर प्रभागात ठोस बदल घडवू.” प्रचारात पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी नागरिकांशी संवाद साधत मतदानासाठी प्रबोधन केले.












