न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ जून २०१९) :- आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त महापौर राहूलदादा जाधव स्पोट्स फाऊंडेशन जाधववाडी व लोकमान्य प्रतिष्ठाण सेक्टर नंबर १६, राजे शिवाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने संत सावतामहाराज उद्यान येथे योग दिवस मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.
यावेळी पिंपरी चिंचवड महानगरपालिकाचे प्रथम नागरीक महापौर राहूल जाधव व त्यांच्या सुविद्य पत्नी मंगलताई जाधव, सामाजीक कार्यकर्ते रवी जांभुळकर, हेमंतभाऊ चव्हाण, राजेश शेळके, शिवकुमार बायस, अमोल इंगळे, सुनिल खरपस, सागर चौधरी, रोहीत चव्हाण, अनिल पवार, सागर पाटील, सचिन दरडे, सुमित कुंभार, प्रशांत अष्टेकर, उत्तम पाटील, सचिन पाटील, माधव अण्णा, सुर्यकांत सावंत व बहूसंख्येने नागरीक उपस्थीत होते. यावेळी योगगुरु मल्लिनाथ कुंभार सर व योगगुरु कदम सर यांनी मार्गदर्शन केले.
याप्रसंगी महापौर राहूलदादा जाधव यांनी सांगितले की माणसाची खरी संपत्ती ही त्याचे शरीर आहे. या शरीराला जर निरोगी व तंदुरुस्त ठेवायचे असेल तर, आपण दररोज व्यायाम व योगासन केले पाहीजेत. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी न चुकता योगासन व व्यायाम करतात म्हणून दिवसाचे अठरा तास न थकता देशासाठी काम करतात. त्यांचा आदर्श आपण ही घेवू व देशाची सेवा करत राहू.
आयोजकांच्या वतीने त्यांचा शाल व श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला. तसेच त्याच्या हस्ते योगगुरु कदम सर यांचा सन्मान करून, सहभागी झालेल्या सर्व नागरीकांना गुलाब पुष्प देवून त्यांचे स्वागत करण्यात आले.















