- चाकूने डोक्यावर वार..
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ सप्टेंबर २०२६) :- पिंपरीतील आंबेडकर चौकाजवळील रॉक्सी हॉटेलसमोर पूर्वीच्या भांडणाच्या रागातून रिक्षाचालकाच्या डोक्यात चाकू मारून त्याला जखमी केल्याची घटना घडली. याप्रकरणी पिंपरी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महेराज हकिम शेख (वय २६, रा. पिंपरी) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २७ सप्टेंबर रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास आरोपी आली व तन्नु (पूर्ण नाव व पत्ता माहिती नाही) हे ऑटो रिक्षातून आंबेडकर चौकाजवळील रॉक्सी हॉटेलसमोर आले.
पूर्वीच्या भांडणाच्या रागातून आरोपींनी शेख यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच शिवीगाळ करून दुखापत करण्याच्या उद्देशाने त्यांच्या डोक्यात चाकू मारून त्यांना जखमी केले.
या प्रकरणी २८ सप्टेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोउपनि दलालवाड करीत आहेत.


















