- प्राधिकरणवासीयांच्या प्रश्नांवर आयुक्तांनी तातडीने बैठक घ्यावी – राजेश फलके…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. ३० सप्टेंबर २०२६) :- पिंपरी-चिंचवड प्राधिकरण परिसरातील हरित सेतू प्रकल्पासंदर्भातील नागरिकांच्या विविध प्रश्नांवर तातडीने बैठक घेण्याची मागणी शिवसेना महानगरप्रमुख राजेश किसनराव फलके यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे. याबाबत त्यांनी आयुक्तांना निवेदन दिले आहे.
हरित सेतू प्रकल्पाबाबत रस्त्यांची रुंदी, फुटपाथ, वाहतूक, पार्किंग, नागरिकांची गैरसोय, प्रकल्पाची आवश्यकता तसेच खर्चाबाबत नागरिकांच्या मनात प्रश्न असल्याचे फलके यांनी निवेदनात म्हटले आहे. नागरिकांच्या शिष्टमंडळाला भेटीसाठी वेळ देण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
आयुक्त कार्यालयाकडून दोन वेळा बैठक निश्चित करून ती रद्द करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला. येत्या आठ दिवसांत बैठक न घेतल्यास ५ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी १० ते १२ या वेळेत सेक्टर २४ येथील काचघर चौकातील हनुमान मंदिरात नागरिकांशी चर्चा करावी, अन्यथा शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा फलके यांनी दिला आहे.

















