न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ जून २०१९) :- मोहननगर येथे श्री साईनाथ तरुण मंडळ व गणेश लंगोटे मित्र परिवार यांचा वतीने करिअर मार्गदर्शन व दहावी अणि बारावीच्या गुणवंत विद्यार्थीयांचा सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे चार्टर्ड अकौंटंट, अभियंता झालेल्या गृहिणींचा विशेष सन्मान करण्यात आला.
यावेळी करिअर मार्गदर्शक प्रा.विजय नवले, अण्णभाऊ साठे विकास महामंडळाचे अध्यक्ष अमित गोरखे, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या शहराध्यक्षा वैशाली काळभोर, मीनल यादव , माजी नगरसेवक नारायण बहिरवाडे, उद्योजक विजय गुप्ता, नाना काळभोर, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष गंगाराम नेवसे, उद्योजक बाळासाहेब बच्चे, सोमनाथ अलंकार आदी उपस्थित होते.
प्रा, नवले म्हणाले, ‘करिअर निवडीमध्ये आवड, क्षमता आणि पात्रता ही त्रिसूत्री आहे. आवडीच्या क्षेत्रात करिअर करावे अथवा जे क्षेत्र मिळाले आहे. त्यात आवड निर्माण करावी. स्कोप हा केवळ कार्यक्षेत्रावर अवलंबून नसतो तर एखाद्या कार्यक्षेत्रातील आपल्या कर्तृत्वावर अवलंबून असतो’
प्रास्ताविक गणेश लंगोटे यांनी केले. सूत्रसंचालन शारदा मुंडे यांनी केले. आभार प्रसाद हिरणवाळे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वैभव भागानगरे, उदय नामदे, ओंकार जैद, सचिन नामदे, शिवतेज चव्हाण, शुभम नामदे, पंकज घुले, हृषिकेश नामदे आदींचे सहकार्य लाभले.













