न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३ जुलै २०१९) :- पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांना उत्तम नागरी सेवा व सुविधा देण्यासाठी महानगरपालिका कटीबध्द असल्याचे मत महापौर राहूल जाधव यांनी व्यक्त केले.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे कै. मधुकर पवळे सभागृहात पिंपरी चिंचवड सहकारी गृहनिर्माण संस्थांचा महासंघ, अधिकारी, पदाधिकारी यांचे समवेत पिंपळे सौदागर व वाकड परिसरातील नागरी समस्यांबाबत आज महापौर राहूल जाधव यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीस शिवसेना गटनेते राहूल कलाटे, अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, नगरसदस्या आरती चोंधे, नगरसदस्य राजेंद्र गावडे, सागर आंगोळकर, संदिप कस्पटे, स्विकृत सदस्य मोरेश्वर शेडगे, शहर अभियंता राजन पाटील, सह शहर अभियंता मकरंद निकम, श्रीकांत सवणे, आरोग्य वैदयकीय अधिकारी डॉ.के.अनिल रॉय, कार्यकारी अभियंता प्रविण लडकत,संदेश चव्हाण,शिरीष पोरेडी, राजेंद्र राणे, उपअभियंता सुनिल भगवाणी,
वैभव पुसाळकर, संध्या वाघ, पिंपरी चिंचवड सहकारी गृह निर्माण संस्थांचा महासंघाचे पदाधिकारी सुरेश राजे, तेजस्वणी ढोमसे, अनिता तुतारे, सचिन लोंढे, डॉ.वैष्णवी गोरडे, सुधीर देशमुख, दत्तात्रय देशमुख, के.सी.गर्ग,अमेय नार्वेकर, विवेक टिटमाणे, आदी उपस्थित होते.
महापौर राहूल जाधव म्हणाले, पिंपरी चिंचवडचे नागरिक सुजान आहेत. त्यामुळेच शहराचा विकास मोठया प्रमाणात होत आहे. विकास कामे करतांना नागरिकांची काही प्रमाणात गैरसोय होत असते परंतू, थोडा त्रास सहन केल्यानंतर चांगले दिवस येत असतात हे विसरुन चालणार नाही. त्यासाठी विकासकामे करतांना नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले. या बैठकीस नगरसदस्य संदिप कस्पटे व स्विकृत सदस्य मोरेश्वर शेडगे यांनी बैठकीचे आयोजन करुन, समस्यां सोडविण्यासाठी घेतलेला पुढाकार महत्वाचा असल्याचेही ते म्हणाले.
यावेळी अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील यांनी संपूर्ण तक्रारींचे निवारण करण्यात येईल, असे आश्वासन दिले. डॉ. के. अनिल रॉय व प्रविण लडकत यांनी कचरा व पाणी पुरवठा या विषयावर चर्चा करुन पुढील काही दिवसात हे प्रश्न मार्गी लागणार आहेत, असे सांगितले.















