न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ४ जुलै २०१९) :- वाहनांची संख्या कमी असल्याचे कारण देत ठेकेदार कचरावेचकाना कामावर घेत नाहीत. दरम्यान, एका गाडीवर दोन कचरावेचक नेमावे अशी, मागणी कचरावेचक संघटनेने केली आहे.
नवीन निविदा प्रक्रियेनुसार दोन खासगी संस्थांना कचरा उचलण्याचा ठेका देण्यात आला आहे. सध्या महापालिकेच्या सहा क्षेत्रीय व कार्यालयांतर्गत जुने कचरावेचक काम करत आहेत. मात्र, अनेक ठिकाणी या कचरावेचकांना वाहनांची संख्या कमी असल्याचे सांगून नंतर कामावर बोलवू, असे ठेकेदार सांगत आहेत. ठेकेदारांच्या या मनमानी कारभारामुळे कचरावेचकांनी नाराजी व्यक्त केली. शहरात कच-याची समस्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. घंटागाडी फिरत नसल्याने कचरा तसाच राहत असल्याच्या तक्रारी नागरिक एकीकडे करीत आहेत. तर, कचरावेचकांना कामावर बोलावले जात नसल्याची तक्रार संघटना करीत आहे. शिफ्टनुसार कामाची विभागणी करून द्यावी, अशी मागणी कचरावेचक संघटनेने केली आहे.
कचरावेचकांना कामावर बोलावले जात नाही. वाहनांची संख्या कमी असल्याचे सांगण्यात येत आहे. शिफ्टनुसार काम द्यावे किंवा एका गाडीवर दोघांना काम दिल्यास ही समस्या संपेल
– सोनाली कुंजीर, सहसचिव – काच-पत्रा वेचक संघटना.
















