न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ४ जुलै २०१९) :- पुण्याच्या धर्तीवर पिंपरी चिंचवड दर्शन बस सुरू केली जाणार आहे. त्याचा निर्णय गुरुवारी (दि. ११) रोजी होणा-या बैठकीत घेतला जाणार आहे. उत्पन्न वाढीसाठी विविध उपाययोजना करण्याबाबत चर्चा बैठकीत करण्यात आली. ‘टार्गेट’ पेक्षा अधिक उत्पन्न देणा-या वाहक व चालकांना प्रोत्साहनपर बक्षीस दिले जाणार आहे.
बसवर डिजीटल जाहिरात करण्यावर भर दिला जाणार आहे. वाकड, च-होली व मोशीतल नियोजित बस डेपो ‘पीपीपी’ तत्त्वावर बांधण्याचे नियोजन केले जाणार आहे. निवृत्त कर्मचा-यांना पेन्शनचा तिढा सोडविण्याच्या सूचना बैठकीत करण्यात आल्या. बडतर्फ २९ कर्मचा-यांची संचालकांसमोर सुनावणी केली जाणार आहे.
















