न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ जुलै २०१९) :- मोरेवस्ती येथील ‘ज्ञान बालविकास शिक्षण संस्था संचलित’ “ज्ञानदा प्राथमिक विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी संस्थेचे सचिव लहू कांबळे, अध्यक्ष गोकुळ गायकवाड सर आदी उपस्थित होते.
मुख्याध्यापिका निता करपे यांनी गोष्टीरुप महत्व सांगितले. पाहुण्यांचे हस्ते खाऊ वाटप करण्यात आला. मोनिका सुतार यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शितल शिंदे व आभार दिपक जरे यांनी केले.
कार्यक्रमाचे नियोजन उमेश माने, मिलिंद चोरगे, हिरामण ढाके, दैवशाला चोले, सांगिता शिंदे, सोनाली पेठकर, प्रिया शिंदे यांनी केले.











