न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ जुलै २०१९) :- ताम्हाणे वस्ती येथील राजमाता अहिल्यादेवी शिक्षण संस्था संचलीत विश्वरत्न इग्लिश मिडीयम स्कुल व कै विष्णूपंत विद्यालयाच्या प्रांगणामध्ये गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम घेतला. कार्यक्रमास अध्यक्ष व्यंकट वाघमोडे व विद्यालयाच्या मुख्याध्यापीका रंजना अव्हाड उपस्थित होते.
विद्यालयाच्या विद्यार्थी शंतनु गायकवाड, धनश्री घोडे, रखी धनोकार, जयश्री तुडमे, स्नेहल घोडे अशा प्रकारे विद्यालयाच्या विद्यार्थी विद्यार्थीनी गुरु परंपरेचे महत्त्व सांगितले. धनश्री घोडे यांनी मात्र गुरु व शिष्य यांची नाती जतण केली पाहिजे. गुरुस आपल प्रेम व कर्तव्य गुरु दक्षिणा म्हणून अर्पण केले पाहिजे. सई पांचळ यांनी शुभेच्छा दिल्या.
रंजना अव्हाड यांनी सत्य धर्म शिकवणारे शिक्षक व आपले आईवडील असतात असे म्हटले तर व्यंकट वाघमोडे यांनी संत परंपरेने चालत आलेल्या रीती व नीती सांगितले विद्यार्थी यांनी गुरू जनास गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. सुत्रसंचलन साधना चव्हाण यांनी केले तर आभार अनीता काळे यांनी मानले.











