न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी :- शहरात गुन्हेगारी वाढली असून कायदा व सुव्यवस्था बिघडली आहे. मागील काही दिवसात घडलेल्या घटनांनी शहर हादरून गेले असून, पोलिसांचा गुन्हेगारांवर धाक राहिला नाही, त्यामुळे गुन्हेगारउजळ माथ्याने मोकाट फिरत आहेत.
या पार्श्वभूमीवर नगरसेवक सचिन चिखले यांनी पोलीस आयुक्त आर. के. पज्ञनाभन यांची भेट घेतली व त्यांना मागण्यांचे निवेदन दिले. प्रभाग स्तरावर गुन्हेगारीस आळा बसवण्यास काय उपाय योजना करता येतील? याबाबत आयुक्तांशी चर्चा केली.
यावेळी नगरसेवक चिखले म्हणाले कि, सिध्दीिविनायकनगरी हा परिसर देहुरोड हद्दीमध्ये येत आहे. परिसरातील नागरिकांना पोलिस तक्रार द्यायची असल्यास ७ किलोमिटर दूर देहुरोडला जावे लागते. यापूर्वी या परिसरात दरोडा, खुनासारखे अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे घडले असून, निगडी पोलिस स्टेशन हे हाकेच्या अंतरावर असताना देखील परिसरातील नागरिकांना देहुरोड पोलीस चौकीस तक्रार देण्यास जावे लागते.
तसेच आकुर्डी पोलिस चौकी ही आकुर्डी हद्दीतच हवी, परंतु ही पोलिस चौकी भक्ती-शक्ती चौकात आहे, त्यामुळे आकुर्डी परिसरातील पोलीस चौकी ही आकुर्डी गावातच करावी, त्याचप्रमाणे डी. वाय. पाटील कॉलेज परिसरातील नागरिकांना चिंचवडगाव पोलिस स्टेशन जवळ असूनही तक्रार देण्यासाठी देहुरोडला जावे लागते.
आदी समस्या यावेळी नगरसेवक सचिन चिखले यांनी पोलीस आयुक्तांच्या निदर्शनास आणू दिल्या असून, पोलीस आयुक्तांनी यात लक्ष घालून नागरिकांना सहज, सुलभ होतील अशा पद्धतीने उपाय योजना करण्याची मागणी नगरसेवक सचिन चिखले यांनी यावेळी केली आहे.
















