न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पुणे, यवत :- शिरूर – सातारा राज्य मार्गावरील दौंड तालुक्यातील चौफुलाजवळ असलेल्या पडवी गावच्या हद्दीत ट्रक व दुचाकी यांच्यामध्ये धडक होऊन झालेल्या अपघातात पिता-पुत्र जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना आज सोमवार (दि. २२) सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास घडली.
अपघातानंतर ट्रक घटनास्थळी सोडून चालक फरार झाला असून त्याच्यावर यवत पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. रामचंद्र तुकाराम लव्हे (वय ५५), अमोल रामचंद्र लव्हे (वय २५, दोघे रा. बाबुर्डी, ता. बारामती) असे मृत्युमुखी पडलेल्या पिता-पुत्रांची नावे आहेत.
आप्पा नामदेव गायकवाड (रा. यवत, ता. दौंड) असे फरार असलेल्या ट्रक चालकाचे नाव आहे. तर राजकुमार किसन लव्हे ( वय ३२ वर्षे रा. बाबुर्डी, ता. बारामती) यांनी फिर्याद दिली आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक विनायक देवकर करीत आहेत.
















