न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ फेब्रुवारी २०२०) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिका व बाबुरावजी घोलप महाविद्यालय सांगवी यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी दिनांक १८ व १९ फेब्रुवारी २०२० रोजी सलग अठरा तास शिवछत्रपती साहित्य वाचन उपक्रम आयोजित केला आहे. या उपक्रमांमध्ये भाग घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी आगाऊ ऑनलाइन नाव नोंदणी करावी असे आवाहन महापौर उषा उर्फ माई ढोरे व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे यांनी केले आहे.
या उपक्रमामध्ये विविध शाळा-महाविद्यालयातील सर्व वयोगटातील विद्यार्थी व विद्यार्थिनी सहभागी होऊ शकतात. यामध्ये सहभागी विद्यार्थ्यांना श्री नामदेवराव जाधव लिखित, शिवाजी- द मॅनेजमेंट गुर हा ग्रंथ वाचनासाठी देण्यात येणार आहे. यामध्ये या ग्रंथाचे वाचन, त्यावरील लिखाण व वक्तृत्व अशा तिन्ही बाबींचा समावेश आहे.
हा उपक्रम नवी सांगवीतील नटसम्राट निळू फुले रंगमंदिर या ठिकाणी आयोजित केलेला आहे. मंगळवार, दि. १८ फेब्रुवारी २०२० रोजी दुपारी चार वाजता सुरुवात होऊन बुधवार दि. १९ फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजता या उपक्रमाचा समारोप होणार आहे. सहभागी होणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी चहा, अल्पोपहार तसेच भोजन दिले जाणार आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या शाळा-महाविद्यालयाचे ओळखपत्र व लिहिताना आधारासाठी पॅड किंवा जाड पुठ्ठा आणणे आवश्यक आहे. या कार्यक्रमांमध्ये विविध शाळा महाविद्यालय विद्यार्थ्यांनी उस्फुर्त सहभाग नोंदवावा असे आवाहन महापौर उषा उर्फ माई ढोरे व प्राचार्य घोरपडे यांनी केले आहे.
ऑनलाइन नाव नोंदणी साठी विद्यार्थ्यांनी खालील Link चाhttps://surveyheart.com/form/5e3a974b024ac803a9bafca3 वापर करावा किंवा
प्रा. जितेंद्र वडशिंगकर ९८८१०३२८३३, संतोष ढोरे ९८९०००२३२६, प्रा. भरत कानगुडे ९८९०१०६९३७ या व्यक्तींशी संपर्क साधावा असे आवाहनही त्यांनी केले आहे.















