न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ फेब्रुवारी २०२०) :- मेडीकल दुकानासाठी दिलेली डिपॉझिट रक्कम मागितल्याच्या कारणावरुन दोन जणांनी मिळून एका डॉक्टरला बेदम मारहाण केली. ही घटना मंगळवारी (दि. ११) दुपारी पिंपरीगाव येथील आयुश्री हॉस्पिटल येथे घडली.
अनुपम नंदलाल अग्रवाल (३४, रा. मालती अपार्टमेंट, पिंपरीगाव) असे मारहाणीत जखमी झालेल्या डॉक्टरचे नाव आहे. त्यांनी बुधवारी (दि. १२) पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, विलास वसंत डांगे (४२, रा. अंजना हौसिंग सोसायटी, रहाटणी) आणि संदीप राजू शिदे (२६, रा. गजानन नगर, रहाटणी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी डॉ. अनुपम अग्रवाल, त्यांचा भाऊ अमित अग्रवाल आणि वडील नंदलाल अग्रवाल हे तिघेही त्यांच्या आयुश्री हास्पिटलमध्ये बसले होते. त्यावेळी तिथे आलेल्या आरोपींकडे डॉ. अनुपम यांनी मेडीकलसाठी डिपॉझिटसाठी दिलेली रक्कम व पगाराची मागणी केली. त्यामुळे संतापलेल्या आरोपींनी तिघांनाही मारहाण केली. पुढील तपास पिंपरी पोलिस करीत आहेत.