न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी :- पवना नदीवरील रावेत बंधा-यातील पाण्याची पातळी कमी झाल्यामुळे अशुद्ध जलउपसा केंद्रातील काही पंपस् बंद करावे लागले आहेत. पाण्याचा उपसा कमी होत असल्यामुळे पिंपरी-चिंचवड शहराचा आज बुधवार (दि. २४ व २५) उद्या गुरुवार रोजी पाणीपुरवठा विस्कळीत राहणार आहे.
पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी विभागाचे प्रयत्न सुरु आहेत. नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन पाणीपुरवठा विभागाने केले आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहराचा आजचा आणि उद्या (गुरुवारी) पाणीपुरवठा विस्कळीत असणार आहे, असे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने कळविले आहे.
















