न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ फेब्रुवारी २०२०) :- भरधाव वेगात जाणाऱ्या क्रेनने चिरडल्याने एका जेष्ठ नागरिकाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना आज शनिवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास गांधीनगर पिंपरी येथे घडली. बबन केरू साळवे असे मृत्यू झालेल्या ज्येष्ठ नागरिकाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साळवे दुपारी साडेतीनच्या सुमारास गांधीनगर येथील सार्वजनिक शौचालयाकडून घराच्या दिशेने पायी जात होते. आजूबाजूला पाहून रस्ता ओलांडून जात असताना पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या क्रेनने त्यांना जागीच चिरडले. यामध्ये डोक्याला गंभीर इजा झाल्याने साळवे यांचा जागीच मृत्यू झाला. याबाबत पिंपरी पोलीस अधिक तपास करीत आहेत.















