न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ फेब्रुवारी २०२०) :- पुत्रप्राप्ती आणि गुप्तधन काढून देण्याच्या बहाण्याने पाच बहिणींचे लैंगिक शोषण करणाऱ्या भोंदूबाबाला सात दिवस पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
सोमनाथ कैलास चव्हाण (वय ३२, रा. खैरेवाडी, ता. रोहा, जि. रायगड) असे या भोंदूबाबाचे नाव आहे. या प्रकरणी २२ वर्षीय तरुणीने पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
आरोपी चव्हाण याने पुत्रप्राप्ती आणि गुप्तधन काढून देण्याच्या बहाण्याने पाच बहिणींचे लैंगिक शोषण केले. यातील एका मुलीला घेऊन तो फरार झाल्याने घटनेला वाचा फुटली. अंधश्रद्धा निर्मूलन समितीने पुढाकार घेत याबाबत पुरावे गोळा केले. पोलिसांनी भोंदूबाबाला न्यायालयात हजर केले असता त्याला २ मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.















