न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ फेब्रुवारी २०२०) :- राज्य सरकारने पाच दिवसांचा आठवडा जाहीर केला आहे. त्या पाठोपाठ पालिकेनेही आपल्या कर्मचाऱ्यांना पाच दिवसांचा आठवडा जाहीर केला. या निर्णयाची अंमलबजावणी येत्या शनिवार (दि. २९) पासून होणार आहे. परंतु, पिंपरी – चिंचवड आरटीओचे कर्मचारी २१ मार्च पर्यंत पहिल्या आणि तिसऱ्या शनिवारी काम करणार आहेत.
२९ फेब्रुवारी, ७ मार्च आणि २१ मार्च रोजी कामकाज सुरु राहणार आहे. नागरिकांनी पुढील २१ तारखेपर्यंत ऑनलाईन बुकिंग केले असून त्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. पूर्वी दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी त्यामुळे या दोन शनिवारी ऑनलाईन बुकिंग करता येत नव्हते. त्यामुळे दुसऱ्या आणि तिसऱ्या शनिवारी अधिकारी व कर्मचाऱ्यांना सुट्टी मिळणार आहे.
शिकाऊ अनुज्ञप्ती ( लर्निग , लायसन्स ) , पक्की अनुज्ञप्ती ( पर्मनंट लायसन्स ) , योग्यता प्रमाणपत्र व नूतनीकरण ( फिटनेस पासिंग ) यासाठी नागरिकांकडून ऑनलाईन अपॉइंटमेंट घेण्यात येते. त्यानुसार, नागरिकांना निश्चित तारीख मिळते. तारखेला संबंधित वाहन धारक वाहनांसह आरटीओ कार्यालयात येतात. २१ मार्च पर्यंत नागरिकांनी ऑनलाईन अपाईंटमेन्ट घेतल्या आहेत. येत्या शनिवार पासून आरटीओच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सट्टी घेतल्यास ऑनलाईन अपॉईंटमेंट घेतलेल्या नागरिकांची गैरसोय होईल. म्हणून २९ फेब्रुवारी, ७ आणि २१ मार्च रोजी आरटीओ कार्यालयाचे काम सुरु राहणार असल्याचे आरटीओकडून सांगण्यात आले आहे.












