न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ फेब्रुवारी २०२०) :- रोड टॅक्स न भरणाऱ्या तसेच आरटीओचा कायमस्वरूपी नंबर न घेणाऱ्या मोटार चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना कासारवाडी येथे बुधवारी ( दि . २६ ) सायंकाळी उघडकीस आली.
फिरोज महंमद खान ( वय ३४, रा . जाधववाडी , चिखली ) असे आरोपीचे नाव आहे. खंडणी विरोधी पथकातील कर्मचारी उमेश मधुकर पुलगम यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपीने घेतलेल्या मोटारीवर एमएच १६ – टीसी – २८१ हा तात्पुरता क्रमांक टाकला. रोड टॅक्सचे ७० हजार रुपये भरले नाहीत. तसेच मोटारीवर आरटीओचा कायमस्वरूपी क्रमांक न टाकता शासनाची फसवणूक केली.












