न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३ मार्च २०२०) :- बनावट कागदपत्रांच्या आधारे जमीन खरेदीचे खोटे दस्तावेज तयार करणाऱ्या पाच जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. ही घटना भोसरी येथे घडली.
श्याम अगरवाल (रा. भोसरी), सुहासिनी मिरजकर (रा. येरवडा, पुणे), सुहासिनी दत्तात्रय मिरजकर (रा. मुंबई), रोहन कांबळे ( पत्ता माहिती नाही ) आणि त्यांचा आणखी एक साथीदार अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.
मनीषा दिलीप भोजणे ( वय ५२, रा. मुंबई) यांनी रविवारी (दि. १) भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना १४ फेब्रुवारी २०१८ ते १७ एप्रिल २०१८ या कालावधीत लांडेवाडी, भोसरी येथे घडली. आरोपींनी आपसात संगनमत करून फिर्यादी यांच्या आईच्या नावे बनावट पॅनकार्ड तयार केले. तसेच बनावट कागदपत्रांच्या आधारे खरेदीखत करण्याचा प्रयत्न करून भोजणे यांचा फसवणुकीचा प्रयत्न केला.












